नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Nawab Malik Interim Bail
Nawab Malik Interim Bail
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. होती. सत्र न्यायालयाच्या पीएमएलए कोर्टाने त्‍यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. इडीने मलिक यांना फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्‍याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारीला अटक केली होती.

त्यांच्या अटकेनंतर, महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, 62 वर्षीय मलिक यांना 8 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आले. मात्र, गेल्‍या गुरुवारी त्‍यांच्या कोठडीत सात मार्चपर्यंत वाढ करण्यात आली.

मलिक यांचे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांशी संबंध असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. हा तपास फरारी गुंड दाऊद इब्राहिम, त्याचे साथीदार आणि मुंबई अंडरवर्ल्डच्या कारवायांशी संबंधित असल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे.

शरद पवार म्हणाले – मलिकांची अटक राजकीय हेतूने प्रेरित 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सांगितले होते की, मलिक यांची अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे. मुस्लिम असल्याने त्यांचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले जात होते. मलिक यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणीही पवारांनी फेटाळून लावली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले, मलिक यांची अटक राजकीय हेतूने प्रेरित आहे. दाऊद इब्राहिम मुस्लिम असल्यामुळे त्याचे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जाणूनबुजून छळ केला जात आहे, पण आम्ही त्याविरोधात लढा देऊ."

राज्यातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने मलिक यांचा राजीनामा मागितला आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले की, मलिक आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत वेगवेगळे मापदंड अवलंबले जात आहेत. विशेष म्हणजे राणे हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. "मला आठवत नाही की आमचे (काँग्रेस) माजी कार्यकर्ते नारायण राणे यांना नुकत्याच झालेल्या अटकेनंतर राजीनामा द्यावा लागला असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news