इम्रान खान ‘त्या’ २२ देशांवर भडकले, “आम्ही तुमचे गुलाम आहोत का?”  | पुढारी

इम्रान खान 'त्या' २२ देशांवर भडकले, "आम्ही तुमचे गुलाम आहोत का?" 

इस्लामाबाद, पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी इल्लामाबाद येथे असणाऱ्या २२ पश्चिमी देशांच्या राजदुतांवरच रविवारी निशाणा साधला. मागील आठवड्यात पाकिस्तानला युक्रेनवरील हल्ला केल्यावरून रशियाचा निषेध करावा, यासाठी आग्रह केला होता. राॅयटर्स या वृत्तसंस्थेनुसार याच आग्रहावरून इम्रान खान हे पश्चिमी देशांच्या राजदुतांवर भडकले आणि म्हणाले की, “पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?”

युरोपीय संघाचे सदस्य देशांसहीत २२ देशांच्या राजदुतांचे प्रमुखांनी १ मार्च रोजी एक संयुक्त पत्र जाहीर केलेले होते. त्यात युक्रेनविरोधा रशियाने जो हल्ला केला आहे, त्याचा निषेध करावा यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेत एक प्रस्ताव ठेवलेला होता. त्याला सर्वांनी समर्थन द्यावं, यासाठी प्रयत्न केला होता. हे पत्र सार्वजनिक पातळीवर जाहीर केलेले होते. अशी प्रकरणे घडणे, हे दुर्मीळ दिसते.

रविवारी एका राजकीय रॅलीमध्ये सर्वांना मार्गदर्शन करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, “तुम्ही आमच्या बाबतीत कोणता विचार करता? आम्ही तुमचे गुलाम आहोत का… की, तुम्ही काहीही सांगाल आणि आम्ही तुम्ही सांगाल तसे करू?” या प्रकरणात जेव्हा संयुक्त राष्ट महासभेत जेव्हा मतदान घेण्यात आले, तेव्हा पश्चिमी देशांचा एक सहकारी राहिलेल्या पाकिस्तानने मतदान सहभागी होण्याचे नाकारले. महासभेच्या सर्वाधिक देशांनी रशियाचा निषेध केला आणि युक्रेनवरील हल्ला चुकीचा होता, असे मत नोंदविले.

इम्रान खान संबंधित राजदुतांना विचारले की, “तम्ही भारतालाही अशाप्रकारे पत्रे पाठवता का? जेव्हा भारताने UNSC आणि UNGA च्या प्रकरणात झालेल्या मतदानात भारताने सहभाग घेतला नव्हता. यु्क्रेनमुळे पाकिस्तानचं नुकसान झालेले आहे. कारण, त्यास देशाने अफगाणिस्तानात नाटोच्या युतीचे समर्थन केले होते. त्यामुळे पाकिस्तान कोणत्याही युतीत सहभागी नाही.”

Back to top button