NCP Crisis News | वय ८३ झालं आता तरी थांबा! अजित पवारांचे शरद पवारांना आवाहन

NCP Crisis News | वय ८३ झालं आता तरी थांबा! अजित पवारांचे शरद पवारांना आवाहन

पुढारी ऑनलाईन : वांद्रे येथील एमईटी येथील बैठकीत अजित पवार यांनी आज आपली भूमिका रोखठोकपणे मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वय ८३ झालं आता तरी थांबा, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. आम्‍ही कोणा दुसर्‍याच्‍या पोटी जमाला आलो ही आमची चूक आहे. खोटो बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही, असा भावूक सूर देखील अजित पवारांनी व्यक्त केला. (NCP Crisis News)

माझी काय चूक झाली? मला नेहमी जनतेसमोर व्हिलन करत आहात, असा सवालही त्यांनी केला. २०१७ मध्येही वर्षा बंगल्यावर आमची बैठक झाली होती. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशावरून छगन भुजबळ, जयंत पटेल, मी आणि इतर अनेकजण तिथे गेलो होतो. तेथे भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. खाते वाटप आणि पालकमंत्री पदाबाबतची जबाबदारी यावर आमच्यात चर्चा झाली. पण नंतर आमच्या पक्षाने एक पाऊल मागे घेतले, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी आज केला.

शरद पवार यांच्या छत्रछायेखाली मी घडलो. साहेब आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही कशासाठी काम करतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे जायचे आहे. हिंदवी स्वराज्याचा स्वप्न साकारायचे आहे. विकासासाठी पक्ष स्थापन केला. १९७८ पासून साहेबांना राज्याने साथ दिली.

मी जे काही आहे ते साहेबांमुळेच आहे. मी कधीही जाती-पातीचे, नात्या-गोत्याचे राजकारण केले नाही. सर्व क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबर असायला हवा. महाराष्ट्राचा विकास हेच माझे स्वप्न आहे. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे राज्य जाणतो. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असला असता. (NCP Crisis News)

भाजप-शिंदे गट- राष्ट्रवादी यांना प्रचंड बहुमत आहे. राष्ट्रवादीत ९ जणांना मंत्रीपद मिळाले आहे. दिवसरात्र मी राज्यासाठी काम करतो. वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय नाही. सर्व समाजाला साथ देणारा मी नेता आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्तेत आलो आहे. २०१४ ला वानखेडेवर आम्ही सर्व शपथविधीला गेलो. तेव्हा आम्हाला शपथविधीला का पाठवले, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news