iffi awards 2023 : नवाजुद्दीन सिद्दीकीची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन्ट्री

iffi awards 2023
iffi awards 2023

पणजीः दीपक जाधव : 'इक ही जान है', 'या तो अल्ला लेगा', 'मोहोब्बत' अशी आपल्या अनोखा शैलीत अभिनय साकारणारा 'गँग्ज ऑफ वासेपूर' फेम अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हटके एन्ट्री केली. आयनॉक्स परिसरात आल्यानंतर चाहत्यांनी एकच गर्दी केली. ( iffi awards 2023 )

संबंधित बातम्या 

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हे शनिवारी (दि. २५ ) रोजी सायंकाळी इफ्फीच्या संभारंभ स्थळी येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. नवाजुद्दीन आत्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आयनॉक्स परिसरात गर्दी केली होती. ( iffi awards 2023 )

सिद्दीकी यांचे आयनॉक्स परिसरात येताच चाहत्यांनी जल्लोष करत त्यांना भोवती गर्दी केली. सिद्दीकीने चाहत्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्यात सामिल झाले. चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन करत काहीनी सेल्फी घेतली. यावेळी सिद्दीकी यांनी एका चाहत्याचा मोबाईल घेवून स्वतः त्यांच्यासोबत सेल्फी घेतली आणि इफ्फीचा सोहळा खास पद्धतीने एन्जॉय केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news