Tiku Weds Sheru : नवाजुद्दीनने २१ वर्षीय अवनीत कौरला केलं Kiss (Trailer)

Tiku Weds Sheru
Tiku Weds Sheru
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंगना राणावतच्या प्रोडक्‍शन हाऊस अंतर्गत पहिला चित्रपट 'ट‍िकू वेड्स शेरू'चा ट्रेलर र‍िलीज हुआ. या चित्रपटाबद्दल आधीपासून चर्चा होत होती. पण, दमदार ट्रेलर समोर येताच मोठा गोंधळ सुरु झाला. कारण होतं-चित्रपटामध्ये ४९ वर्षाचा अभिनेता नवाजुद्दीनची अभिनेत्री केवळ २१ वर्षांची आहे. अभिनेत्री अवनीत कौरने यामध्ये भूमिका केलीय. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नवाज आणि अवनीत यांच्यामध्ये किसींग सीन दाखवण्यात आलाय. त्यामुळे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशी टीका कंगनावर नेटकऱ्यांकडून होत असलेली दिसते. (Tiku Weds Sheru)

दरम्यान, पंगा क्विन कंगना राणावत काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यात कंगना लग्नपत्रिका वाटत असल्याची चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र कंगनाच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

तर अनेक चाहते कंगनाला कोणासोबत लग्न करणार आहेस? असा प्रश्न विचारत आहे. व्हिडीओ पाहून तिचे चाहते देखील थक्क झाले आहेत. व्हिडीओत कंगना नव्या नवरी प्रमाणे सजलेली दिसून येत आहे. कारमध्ये बसलेल्या कंगनाला पापाराझींना विचारते एवढा गोंधळ का आहे, यावर पापाराझी कंगनाला विचारतात, तू लग्न करत आहे… ही गोष्ट खरी आहे काय?

यावर कंगना म्हणते, 'बातम्या तर तुम्ही पसरवता. मी तर केवळ आनंदाच्या बातम्या देते'. यानंतर त्यानंतर कंगना एक कार्ड देते आणि सर्वांना आमंत्रण देते. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण हैराण देखील झाले आहेत एक नेटकरी म्हणाला, की अखेर 'टीकू वेड्स शेरू' येणार आहे, आपली टीकू अशी दुसर्‍या एकाने कमेंट केली आहे तर 'तनू वेड्स मनू' सिनेमाचे प्रमोशन आहे असे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया दुसर्‍या एकाने केली आहे. त्यामुळे नक्की प्रकरण काय? हे कंगनाच्या भूमिकेनंतर स्पष्ट होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news