Navratri 2023 Ambabaiche Dagine : श्री अंबाबाईचा मौल्यवान खजिना

ठुशी-मयुराकार जडावाची कवचकुंडले व पान
ठुशी-मयुराकार जडावाची कवचकुंडले व पान
Published on
Updated on

श्री अंबाबाई देवीला तत्कालीन राजवटींकडून दागदागिन्यांसह अनेक दान म्हणून आहेत. (Navratri 2023 Ambabaiche Dagine) करवीर छत्रपती दुसरे संभाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत तत्कालीन करवीर राज्य अधिपतींनी देवीला अलंकार अर्पण केले आहेत. सातारा छत्रपती घराण्यातून देवीला जडजवाहिर अर्पण करण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ग्वाल्हेरकर शिंदे घराण्यासह अनेक सरदार, संस्थानिकांनीही देवीला वेळोवेळी अलंकार अर्पण केले आहेत. (Navratri 2023 Ambabaiche Dagine)

तन्मणी :

सोन्याच्या सुबक व रेखीव अशा मण्यांनी सुसर अशी देवीची तन्मणी आहे. अत्यंत नाजूक कलाकुसर केलेले मणी यामध्ये आहेत. मण्यांचा एकसारखेपणा असावा याची विशेष कण्यात आली आहे.

ठुशी :

कोल्हापुरी बनावटीची लहान सोन्याच्या मण्यांच्या गुंफणातून तयार करण्यात आली आहे. मणी गादीवर याचे काम करण्यात आले आहे. देवीचा हा दागिना असा तयार केला आहे की, घातल्यानंतर तो जराही टोचत नाही.

मयुराकार जडावाची कवचकुंडले व पान :

देवीच्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या कवचकुंडलांना विशेष स्थान आहे. मयुराकार कुंडलांनी देवीचे रूप अधिक खुलते. पुष्कराज, श्रीलंकन नारंगी पुष्कराज यासह लाल, पांढरे व काळ्या रंगाचे खडे असणारा आहे. पानातही रत्ने आहेत. याला मयुर कर्णफुले असेही म्हणतात.

कवड्यांची माळ :

अंबाबाईला कितीही रत्नालंकारांनी मढवले तरी तिचा खरा दागिना म्हणजे कवड्यांची माळ, असे मानले जाते. देवीची कवड्यांची माळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. लहान-लहान कवड्यांची फुले गुंफून ही माळ बनवण्यात आली आहे. मूळ मूर्ती व उत्सवमूर्ती यांना नेहमी कवड्यांची माळ घातली जाते. कितीही सोन्याचे व रत्नजडित दागिने घातले तरी कवड्यांच्या माळेमुळे देवीचे रूप अधिक खुलून येते.

गदा आणि म्हाळुंग :

परमेश्वरी व विश्वाची मूलप्रकृती अशी महालक्ष्मी त्रिगुणात्मक असून लक्षरूपाने अखिल विश्वास व्यापून राहिलेली आहे. मातृसिंग, गदा खेटव पानपात्र धारण करणाऱ्या, मस्तकावर नाग लिंग आणि योनी धारण करणाऱ्या शुद्ध झालेल्या सुवर्णाच्या अलंकारांनी नटलेल्या तिने हे सर्व शून्य विश्व आपल्या तेजाने भारून टाकले आहे अशी स्तुती 'श्री दुर्गा सप्तशती मध्ये श्री महालक्ष्मीची करण्यात आली आहे. वर्णनानुसार देवीच्या हाती जी आयुधे आहेत. त्यांचेही महत्त्व आहे. हातातील म्हाळुंग हे मातृशक्तीचे प्रतीक आहे. प्रतीक आहे.

या देवीच्या हाती असलेली गदा है क्रियाशक्तीचे प्रतीक आहे. तर रक्षणशक्तीचे प्रतीक ढाल आहे. यापैकी गदा आणि म्हाळुंग हे सोन्यात मढवलेले असून ते देवीच्या नित्यपूजेसाठी वापरले जाते. सोन्यात मढलेल्या गदाधारी अंबाबाईचे रूप अतिशय सुंदर दिसते.

मोतीहार :

देवीचे दोन, चार व सातपदरी मोत्याचे हार आहेत. हारांमध्ये उच्चप्रतीच्या मोत्यांचा वापर मोत्यांचा वापर केला आहे. काही मोतीहारांमध्ये सोन्याचे पदकही वापरण्यात आले आहेत. सात पदरी मोतीहारामध्ये लहान-लहान पदके वापरण्यात आली आहेत. यामध्ये लफ्फा मोतीहारही आहे. सोन्याचे मणी व मोत्यांचा हार दुर्मीळ मानला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news