IPL 2024 : क्रिकेट कॉमेंट्री ‘सरदार’ इज बॅक..! नवज्योतसिंग सिद्धू करणार पुनरागमन

IPL 2024 : क्रिकेट कॉमेंट्री ‘सरदार’ इज बॅक..! नवज्योतसिंग सिद्धू करणार पुनरागमन

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस बाकी असताना क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. 22 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात येणार आहे. यावेळी सामन्याचे कॉमेंट्री करण्यासाठी कॉमेंट्रीचा 'सरदार' म्हणून ओळखले जाणारे नवज्योतसिंग सिद्धू पुनरागमन करणार आहेत. याबाबतची अधिकृत माहिती स्टार स्पोर्ट्सने ट्विटकरून दिली आहे. (IPL 2024)

गेल्या अनेक दिवसांपासून नवज्योत सिंग सिद्धू विविध कारणांमुळे क्रिकेटच्या कॉमेट्रीपासून दूर होते. परंतु, आता ते आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून कॉमेंट्रीच्या क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. कॉमेट्री दरम्यानची त्यांची अनेक वाक्ये प्रसिद्ध होतात. सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल होतात. त्यांनी सामन्यादरम्यान कॉमेंट्रीकरून या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पुनरागमनाने कॉमेंट्री बॉक्समध्ये नवी ऊर्जा पाहायला मिळणार आहे. (IPL 2024)

'स्टार स्पोर्ट्स'ने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धूच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये परतल्याची माहिती दिली. पोस्टर शेअर करताना लिहिले  आहे की, "कॉमेंट्री बॉक्सचे सरदार नवज्योत सिंग सिद्धू परत आले आहेत.सिद्धू यांची कॉमेंट्री आवडणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी ही बातमी खूप आनंददायी असेल.

लोकसभा निवडणूकीपासून दूर राहणार नवज्योत सिंग सिद्धू

कॉमेंट्री बॉक्समध्ये परतणारे काँग्रेस नेते आणि माजी भारतीय क्रिकेटर 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून दूर राहू शकतात. पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिद्धू यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.

नवज्योत सिंग सिद्धू यांची क्रिकेट कारकीर्द

नवज्योत सिंग सिद्धू यांनी 1983 ते 1999 दरम्यान भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. ते भारतासाठी सलामीवीर म्हणून खेळत असे. या काळात त्यांनी 51 कसोटी आणि 136 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीच्या 78 डावांमध्ये त्याने 42.13 च्या सरासरीने 3202 धावा केल्या ज्यात 9 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या 127 डावांमध्ये सिद्धूने 37.08 च्या सरासरीने 4413 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 6 शतके आणि 33 अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news