सरकारचा बडगा..! गुगल प्ले स्टोअरवर ‘नौकरी’, ’99 एकर’ ॲप ‘जैसे थे’

सरकारचा बडगा..! गुगल प्ले स्टोअरवर ‘नौकरी’, ’99 एकर’ ॲप ‘जैसे थे’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुगल 'प्ले स्टोअर'ने 'नौकरी', '99 एकर'सह काही ॲप्‍स हटविण्‍याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर  केंद्र सरकारने तीव्र आक्षेप घेतला. अशा प्रकारची एकतर्फी निर्णय घेणार नाही, असे आम्‍ही स्‍पष्‍ट केले. त्‍यामुळे आता Google ने Play Store हटवलेले काही भारतीय ॲप्स पुन्हा कार्यन्‍वित केले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'पीटीआय'शी बोलताना दिली.

'गुगल प्ले स्टोअर'ने ॲप्‍स का हटवले?

संबंधित ॲपच्‍या व्‍यवहारांसाठी किती पैसे आकारावेत, याबद्दल सहमती झाली नाही. गुगलला ११ ते २६ टक्क्यांदरम्यान शुल्क आकारायचे होते, मात्र संबंधित कंपन्‍यांचा याला विरोध होता. यानंतरही गुगलने आपल्‍या प्‍ले स्‍टोअरवरुन काही ॲप हटविण्‍याचा निर्णय घेतला होता.

केंद्राचा तीव्र आक्षेप, ॲप्‍स पुन्‍हा कार्यन्‍वित

केंद्र सरकारने याला तीव्र आक्षेप घेतला. आम्ही ॲप्स हटवण्याची परवानगी देणार नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. केंद्र सरकारच्‍या हस्‍तक्षेपानंतर नौकरी, 99 एकर, नौकरी गोल्‍फ, पीपल ग्रुपचे मॅट्रिमोनी आदी ॲप शनिवारी दुपारी प्‍ले स्‍टोअरवर पुन्‍हा एकदा कार्यन्‍वित करण्‍यात आल्‍याचे दिसले.

अशा प्रकारे ॲप्स हटवण्याची परवानगी गुगलला देता देणार नाही. आम्‍ही घेतलेल्‍या निर्णयामुळे आमच्या स्टार्ट अप्सना संरक्षण मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी 'पीटीआय'शी बोलताना व्‍यक्‍त केला.

यासंदर्भात माहिती देताना इन्फो एजचे सह-संस्थापक संजीव बिकचंदानी यांनी सांगितले की, "अनेक इन्फो एज ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर पुन्‍हा एकदा कार्यन्‍वित झाले आहेत. आम्‍ही संकट व्यवस्थापन चांगल्‍या पद्‍धतीने हाताळले. प्रभावित कंपन्यांसाठी केंद्र सरकारने  केलेला हस्तक्षेप स्वागतार्ह आहे."

गुगलने सरकारचे काही ॲप्‍स हटविल्‍यानंतर सोशल मीडियावरुन या निर्णयाबाबत तीव्र टीका झाली. काहींनी कंपनीच्‍या मक्तेदारीवर भाष्‍य केले हाेते. इंडस्ट्री बॉडी इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) नेही गुगलच्या या निर्णयाचा निषेध केला होता. तसेच हटविण्‍यात आलेले ॲप्‍स तत्‍काळ सुरु करण्‍याची विनंती केली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news