Stress Awareness : तणावाचे दुष्परिणाम टाळण्‍यासाठी रोजच्‍या जगण्‍यात ‘या’ टिप्स फॉलो करा

Stress Awareness : तणावाचे दुष्परिणाम टाळण्‍यासाठी रोजच्‍या जगण्‍यात ‘या’ टिप्स फॉलो करा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजच्‍या बदलत्‍या जगण्‍यात तणाव हा अपरिहार्य भाग झाला आहे. तणाव हा शब्दच चिंताग्रस्त भावनांशी संबंधित आहे. मॉडर्न जीवनशैलीमुळे लोकांना दिवसेंदिवस त्रास देणारी कारणे वाढली आहेत. त्याचाच मानसिक आणि शारीरिक परिणाम होत असतो. ही समस्या एवढी गंभीर झाली आहे की, ब्रिटनमध्ये २ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय तणाव जागरूकता दिवस (Stress Awareness  ) म्हणून साजरा केला जातो. आधुनिक जगातील तणावाविषयी जागरूक राहण्यासाठी, त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी आणि त्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

तुमच्यावर दडपण आणणारी कोणतीही गोष्ट मग ती नोकरी असो, जीवनातील संघर्ष किंवा तुम्हाला सतत चिंतेच्या स्थितीत सोडणारे नातेसंबंध असो. यामुळे येणारा तणाव हा खरा मारक ठरू शकतो. खरं तर, आकडेवारी दर्शवते की, कामाशी संबंधित तणावाचा थेट परिणाम म्हणून दरवर्षी १लाखा पेक्षा जास्त अमेरिकन मृत्युमुखी पडतात.

Stress Awareness : तणाव दूर करण्यासाठी या गोष्टी करा

नियमित ध्यान करा


नियमित ध्‍यान केल्याामुळे मनावरील तणाव कमी होण्‍यास मदत होते, असे अनेक संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. ध्‍यान करण्‍याच्‍या अनेक पद्‍धती आहेत. त्‍याचा वापर करुन तुम्‍ही एक तणावमुक्‍त जीवन जगू शकता.

दररोज व्‍यायाम हवाच


निरोगी शरीरासाठी तुम्‍ही नियमितपणे व्‍यायाम करणे आवश्‍यक आहे. व्‍यायामामुळे तणाव कमी होण्‍यास मदत होते. तुमचा मूड अधिक चांगला होतो. विविध रोगांपासून लांब राहण्‍यासही मदत होते. तणावमुक्त राहण्यासाठी तुम्‍ही शारीरिकदृष्‍ट्या निरोगी असणे आवश्‍यक आहे. यातूनच तुमची प्रतिकार शक्‍तीही वाढते. नियमित व्‍यायाम करण्‍यास आळस करु नका.

दीर्घ श्वसनाचा सराव करा
तुमच्या सहानुभूतीशील मज्जासंस्थेची सक्रियता कमी करण्याचा दीर्घ श्वास घेणे हा एक उत्तम मार्ग आहे, जो समजलेल्या धोक्याला शरीराच्या प्रतिसादावर नियंत्रण ठेवतो. पाच सेकंदांच्या मोजणीत घेतलेले दीर्घ श्वास, दोन सेकंदांसाठी धरून आणि पाच सेकंदांच्या संख्येत सोडले गेले, यामुळे तुमची पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला जाणवत असलेला एकूण ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते.

चांगला आहार ठेवा


तुम्‍ही घेत असलेला आहारचा परिणाम मानसिक स्‍वास्‍थावरही होतो. संतुलित आहात हा चिंता आणि तणाव कमी करण्‍यास मदत करतो. पोषक तत्‍व कमी असणारा आहार हा मानसिक रोगांना निमंत्रणच देत असतो. शारीरिक व्यायाम आणि आहार हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. जेव्हा तुमचे शरीर निरोगी असते, तेव्हा तुमचे मन निरोगी असू शकते. शारीरिक व्यायाम हा एक उत्तम तणाव निवारक असल्याचे सिद्ध झाले आहे आणि आपल्या एकूण जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत करते. पोषण हे महत्वाचे आहे कारण तणावामुळे काही जीवनसत्त्वे कमी होऊ शकतात, जसे की A, B कॉम्प्लेक्स, C आणि E. योग्य पोषण राखल्याने केवळ तुमच्या शरीरालाच नव्हे तर तुमच्या मनालाही चांगले वाटण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला तणावाचा चांगल्या प्रकारे सामना करता येतो.

पुरेशी झोप घ्या


अलिकडे जीवनशैलीत झालेल्‍या बदलांमुळे अनेकांना अनिद्रेचा त्रास होतो. तुम्‍हाला चांगली झोप लागत नसेल तर तुमची चिडचिड होते. अनिद्रेमुळे मानसिकदृष्‍ट्याही व्‍यक्‍ती कमकुवत होत असल्‍याचेही संशोधनात आढळले आहे. त्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍या झोपेच्‍या वेळेकडे दुर्लश करु नका. कारण  झोप हा आरोग्‍याचा पाया मानला जातो.

इतरांशी कनेक्ट व्हा

मनुष्‍य हा एक समाजिक प्राणी आहे, असे आपण अनेक वेळा वाचलं वा ऐकले असेल. तुमचे मानसिक आरोग्‍य निरोगी असेल तर तुम्‍ही अनेक लोकांशी जोडले जावू शकता. अशा व्‍यक्‍ती तणावग्रस्‍त घटनांना अधिक सक्षमपणे सामोरे जावू शकते. तसेच तुम्‍ही सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला तरी तुमचे मानसिक स्‍वास्‍थ चांगले राहण्‍यास मदत होते. तुम्हाला आधार वाटण्यासाठी लोकांशी संबंध असणे आवश्यक आहे. एकत्रित केलेल्या गोष्टींचा आनंद घेतल्याने तुम्हाला प्रोत्साहन मिळते. आणि कठीण प्रसंगी आधार देणारे नातेसंबंध वाढवणे शक्य होते.

सोशल मीडियावरील वेळाचे नियोजन करा

सोशल मीडिया साइट्सवर वेळ घालवणे तणावपूर्ण बनू शकते, केवळ त्यांच्यावर काय पाहतो यावरूनच नाही तर तुम्ही सोशल मीडियावर घालवलेला वेळ मित्रांसोबत भेटण्यात, बाहेर हवामानाचा आनंद घेण्यासाठी किंवा एखादे उत्तम पुस्तक वाचण्यात सर्वात चांगला वेळ घालवला जाऊ शकतो. आजच्‍या जगण्‍यात तणाव हा अपरिहार्य आहेच. मात्र तुम्‍ही आपल्‍या दैनंदिन कामासह आपल्‍या जीवनशैलीत वरील टीप्‍स फॉलो केल्‍या तर निश्‍चित तुम्‍हाला एक तणावमुक्‍त जीवन जगण्‍याची संधी मिळते, हे नेहमीच लक्षात ठेवा

 हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news