नाशिकमधील श्री कपालेश्‍वर शिवलिंगावर लवकरच वज्रलेप, काय आहे ‘या’ मंदिराची खासियत?

नाशिकमधील श्री कपालेश्‍वर शिवलिंगावर लवकरच वज्रलेप, काय आहे ‘या’ मंदिराची खासियत?
Published on
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

श्री कपालेश्‍वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची झीज होत असल्याने लवकरच सर्वांना विश्‍वासात घेऊन वज्रलेप लावणार असल्याची माहिती विश्‍वस्त मंडळाने दिली. तसेच श्री कपालेश्‍वर देवस्थान ट्रस्ट विश्‍वस्त मंडळातर्फे भाविकांसाठी विविध उपाययोजना करणार आहे. याशिवाय प्रदोषसह दर सोमवारी काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याचेही वेळापत्रक निश्‍चित केल्याची माहिती यावेळी दिली.

नंदी नसलेले एकमेव शिवालय अशी ओळख असलेल्या श्री कपालेश्‍वर देवस्थानला श्रावण महिन्याचे औचित्य साधत लाखो भाविकांनी भेट दिली. देवस्थानतर्फे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना केल्या असून त्यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. शिवलिंगाची झीज झाल्याने त्यावर सर्वांना विश्‍वासात घेऊन वज्रलेप लावणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

भाविकांच्या सोईसाठी मंदिराच्या पायऱ्यांवर नव्याने रेलिंग व लाईटची व्यवस्था केली असून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तेरा सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. मंदिराच्या कलशाकडील भागाचा जिर्णोद्धार लवकरच पूर्ण होईल. देणग्यांसाठी ऑनलाईन प्रणाली कार्यरत केली असून शहरातील पाच ढोल पथकांच्या विनामूल्य सेवेसाठी वेळापत्रकही निश्‍चित केल्याचे विश्‍वस्त मंडळाने सांगितले. संपूर्ण श्रावण महिन्यात दर्शनासाठी नव्याने नियोजन केले, त्यामुळे सर्वांनाच सुलभ दर्शनाचा लाभ मिळाल्याचे सांगण्यात आले. तर लवकरच वेबसाइट, हेल्पलाइन नंबर, संस्थानची अधिकृत वेबसाइट, हेल्पलाईन नंबर लवकरच कार्यान्वित करणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपल्या भारतीय संस्कृतीला साजेशी वेशभूषा करून मंदिरात यावे, श्रावण महिन्यात मंदिराला विद्युत रोषणाई केल्याची माहिती दिली. यावेळी अध्यक्ष मंडलेश्‍वर काळे, उपाध्यक्ष रावसाहेब कोशिरे, सचिव ॲड. अक्षय कलंत्री, खजिनदार श्रीकांत राठी, विश्‍वस्त ॲड. प्रशांत जाधव, श्रद्धा दुसाने (कोतवाल), सुनील पटेल आदी उपस्थित होते.

पालखी सोहळ्याचेही नियोजन

दर सोमवारसह प्रदोषनिमित्त काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याचे स्वतंत्र नियोजन केले आहे. दुपारी साडे तीन वाजता चांदीच्या पंचमुखी मुखवट्याचे मंदिरात आगमन होईल. तर पावणेचार ते चारपर्यंत आरती सोहळा पार पडेल. चार वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ होऊन साडेसहा वाजता पालखी रामतीर्थावर दाखल होईल. तेथील विधिवत पुजेनंतर हा सोहळा मंदिराकडे रवाना. नऊ ते साडेनऊ दरम्यान आरती. त्यानंतर आरती व पालखी सोहळ्याची सांगता होईल. याशिवाय ढोल पथकाचेही स्वतंत्र नियोजन केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news