नाशिक : महागाईच्या भोंग्याविरोधात युवक राष्ट्रवादीचे महिलांना चूल व लाकडे देत आंदोलन

नाशिक : महागाईच्या भोंग्याविरोधात युवक राष्ट्रवादीचे महिलांना चूल व लाकडे देत आंदोलन

नाशिक : वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात उपहासात्मक आंदोलन करून सर्वसामान्य महिलांना चूल व लाकडे भेट देऊन महागाईचा निषेध करण्यात आला.

मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरसह इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.  या महिन्यात गॅसच्या किंमतीत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली असून सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे सांगत राष्ट्रवादीने महागाईच्या विरोधात आंदोलन छेडले आहे  या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह नाशिक शहरात केंद्र सरकार विरोधात घोषणा देत सर्वसामान्य महिलांना चूल व लाकडे भेट देऊन उपहासात्मक आंदोलन केले.

यावेळी शादाब सैय्यद, चेतन कासव, जय कोतवाल, नितीन निगळ, रामदास मेदगे, सागर बेदरकर, निलेश भंदुरे, गणेश पवार, सोनू वायकर, राहुल कमानकर, हर्षल चव्हाण, राहुल पाठक, डॉ. संदीप चव्हाण, निलेश सानप, किरण पानकर, संतोष भुजबळ, रेहान शेख, सुनिल घुगे, विक्रांत डहाळे, अक्षय पाटील, जाणू नवले, मोनू वर्मा, स्वराज्य हाके, केशव येवले, तुकाराम फासाटे, अक्षय खालकर, काशिनाथ चव्हाण, आदिल खान, नबील सय्यद, रझा शेख, निरंजन पगार आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या आजारातून सर्वसामान्य जनता आता कुठे सावरत आहे.  अशातच महागाईमुळे जनता पुन्हा त्रस्त झाली आहे. केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील महिलांकरिता उज्वला गॅस योजना आणली. परंतु सध्याची स्थिती बघता त्यांना पुन्हा चूल पेटविण्याची वेळ आली असल्याने आम्ही पुन्हा सर्वसामान्य महिलांना चूल भेट देत आहोत.

– अंबादास खैरे – शहराध्यक्ष, रा.यु.कॉं

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news