त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात मृग नक्षत्र कोरडे गेले आणि आर्द्रादेखील हुलकावणी देणार, असे वातावरण आहे. त्यामुळे मेघराजांची सर्वांवर कृपा व्हावी, यासाठी पंचायती अखाडा श्री निरंजनी महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी शुक्रवारी (दि. २३) सकाळी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाला जलाभिषेक करून साकडे घातले.
लवकर पाऊस सुरू व्हावा, यासाठी त्र्यंबकराजाची आराधना केली. चंद्रकांत अकोलकर, किशोरपेंडोळे, जोशीयांनी पौरोहित्य केले. श्रीरामशक्तिपीठाचे श्रीनाथानंद सरस्वती महाराज, सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्यासह डॉ. मारगाजरे, अभय मोरे उपस्थित होते. तर सोमेश्वरानंद महाराज यांनी चातुर्मास लवकरच सुरू होणार असल्याने कुशावर्ताचे पाणी स्वच्छ राहावे, भाविकांना स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे आवाहन करत ही हनुमंतरायांची जन्मभूमी असून येथे त्र्यंबकराजा व हनुमंतराय कृपा करतील व लवकरात लवकर पावसाचे आगमन होईल, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा :