नाशिक : शेतीकाम सांगिल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्याचा केला खून

नाशिक : शेतीकाम सांगिल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्याचा केला खून

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

वडिलांनी शेतात कामाला जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने संतापाच्या भरात फावड्याने जन्मदात्याच्या डोक्यावर वार करुन खून केल्याच्या आरोपावरुन दिंडोरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयीत आरोपी फरार झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहीती अशी की, दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथील साहेबराव मुरलीधर मालसाने (55) यांनी त्यांचा मुलगा पप्पु उर्फ हिरामन साहेबराव मालसाने याला शेतात काम करायला जा असे सांगितले. शेतीकाम सांगिल्याचा राग आल्याने मुलगा पप्पू (हिरामण) याने रागाच्या भरात जन्मदात्या बापाच्या डोक्यात व पाठीवर, उजव्या हातावर, उजव्या पायावर फावड्याने मारले. गंभीर स्वरुपाची मारहाण झाल्याने या अनपेक्षित हल्यात साहेबराव हे जागीच ठार झाले. गोरख साहेबराव मालसाने यांनी पप्पुू मालसाने याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दिंडोरी पोलिसांनी पप्पु (हिरामण) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट पुढील तपास करत आहेत. घटना घडल्यानंतर संशयीत पप्पू मालसाने हा फरार झाला असुन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news