राजेश टोपेंनी २५ वर्षात मतदारांना टोप्या घातल्या : आमदार गोपीचंद पडळकर | पुढारी

राजेश टोपेंनी २५ वर्षात मतदारांना टोप्या घातल्या : आमदार गोपीचंद पडळकर

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री राजेश टोपे यांनी मागील 25 वर्षात मतदारांना टोप्या घालण्याचे काम केले आहे. आता मतदारांनी 2024 मध्ये त्यांना टोपी घालावी, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी (दि.१४) केली. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महाजनसंपर्क अभियान तसेच लाभार्थी संमेलन व जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य सुनिल आर्दड, अंकुश बोबडे, दीपक ठाकूर, शारदा पांढरे, अॅड. विजय खटके, अॅड. वैभव खटके, बंडू आराध्ये, अशोक तारख आदी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले की, राजेश टोपे यांनी 25 वर्षात अंबड, घनसांवगीचा  तालुक्याचा विकास केला नाही. 25 वर्षांपासून आमदार असूनसुद्धा त्यांना दर्जेदार रस्ते करता आले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेचा विकास नको आहे. केवळ स्वार्थासाठी सत्ता पाहिजे, असे टीकास्त्र सोडले.

नारळ फोडया मंत्री म्हणून राजेश टोपेंच नाव: सुनिल आर्दड

पाचव्यांदा राजेश टोपे आमदार झाले आहेत. मात्र, एकही नवीन रस्ता अंबड घनसवांगी तालुक्यात झालेला नाही. केवळ नारळ फोडया मंत्री म्हणून राजेश टोपेंचे नाव आहे. विकास व्हावा, असे कधीही टोपे यांना वाटले नाही, अशी टीका भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य सुनिल आर्दड यांनी यावेळी केली.

हेही वाचा 

स्थानिक विकास निधीतून जत तालुक्याला दीड कोटीचा निधी मंजूर: गोपीचंद पडळकर

धर्मांतर, चर्च बांधकाम प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांची विधानसभेत लक्ष्यवेधी

आमदार बाबर २०२४ ची विधानसभा लढवणार नाहीत, गोपीचंद पडळकर यांचा दावा

Back to top button