नाशिक : सुरेंद्र देशमुख सिन्नरचे नवे तहसीलदार

सुरेंद्र देशमुख www.pudhari.news
सुरेंद्र देशमुख www.pudhari.news

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा
तहसीलदार एकनाथ बंगाळे यांची चोपडा येथील प्रांत म्हणून बदली झाल्याने येथील तहसीलदारपदी सुरेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. बंगाळे यांनी एमपीएससीतून उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातलेली आहे. तथापि, परिविक्षाधिन कार्यकाळात सिन्नरचे तहसीलदार म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. हा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते चोपडा येथे प्रांत म्हणून बदलून गेले आहेत. आरंभी सिन्नर प्रांत म्हणूनच त्यांची नेमणूक झाली होती. मात्र, अचानक त्यांना चोपडा प्रांत म्हणून बदलीचे आदेश प्राप्त झाल्याने ते शनिवारी (दि. 17) चोपडा येथे रुजू होत आहेत. दरम्यान, खुलताबाद येथून बदलून आलेले तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी सिन्नरचे तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. सिन्नरला अपर तहसीलदार म्हणूनही एक पद भरण्यात आले होते. मात्र, तूर्त ही प्रक्रिया बारगळली असल्याचे समजते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news