नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळा गोबापूर (कळवण ) येथील विद्यार्थांना शिक्षणासाठी फक्त दोनच खोल्या उपलब्ध आहेत. दोनच वर्गामध्ये इयत्ता १ पहिली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याकडे शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केले आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शिक्षण हक्क कायद्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देणे, सर्व शाळाबाहय मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, गुणवत्ता वाढवणे आदी बाबींचा समावेश आहे. पण हे शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थाना वर्ग खोल्या, शौचालय नाहीत तर कायद्याचा काय उपयोग ? असा सवाल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांतून उपस्थित केला जात आहे.गोबापूर येथील प्राथमिक शाळेत इयत्ता १ पहिली ते ४ थी वर्ग आहेत विद्यार्थाना शिकवण्यासाठी ३ शिक्षक आहेत. २ वर्ग खोल्या आहेत त्याही मोडकळीस झाल्या आहेत. शिक्षणाचा सावळागोंधळ सुरु आहे. दोनच वर्गखोलीत अनेक इयत्तांचे 'धडे' गिरवले जात आहेत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सर्वसामान्य, गोरगरीब मुलांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध होते. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. पण हे मुलांना शिक्षण घेण्यासाठी योग्य वर्ग खोल्या नसल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत वतीने नव्याने बांधकाम सुरु करण्यात आले मात्र वर्गामध्ये २० मुले बसणार नाही रामभरोसे कारभार ग्रामपंचायत केला आहे. विशेष म्हणजे नव्याने बांधकाम सुरु केले त्याची रुंदी १३ फूट तर लांबी १७ फूट आहे अंदाजपत्रक ५ लाखाचे आहे. गोबापूर येथील शाळेची पाहणी करताना माजी आमदार जे पी गावित समेवत.माकपाचे मोहन जाधव,शिंदे गटाचे संदीप वाघ, दीपक खांडवी चेतूर महाले ,दिनेश गांगुर्डे ,सोमनाथ गायकवाड ,विकास गांगुर्डे ,अजय बहिरम ,नितीन गांगुर्डे ,मनोज गावित ,सोनाबाई गायकवाड अंजना बर्डे ,राणीबाई माळी ,तानाजी बहिरम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वसामान्य वर्गातील मुलांना शिक्षण देणाऱया प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजे, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे येथील शाळेला वर्ग खोल्या नसल्याने मुलांना योग्यरीत्या शिक्षण घेता येत नाही मात्र गोबापूर येथील प्राथमिक शाळेला वर्ग खोल्यासाठी शासनाकडे मागणी करणार आहे. – जे पी गावित, माजी आमदार.