Saptashrungi Gad Bus Accident : सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना, पालकमंत्र्यांनी जखमींची घेतली भेट

Saptashrungi Gad Bus Accident : सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना, पालकमंत्र्यांनी जखमींची घेतली भेट
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर प्रवासी बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला असून तब्बल 22 प्रवासी जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले असून पालकमंत्री दादा भुसे देखील तिथे पोहचले आहेत. त्यांनी जखमींची भेट घेत विचारपूस केली.

घाटातील गणपती पॉईंटजवळ हा अपघात झाला. जखमींवर नांदुरी व वणी ग्रामिण रूग्‍णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस खामगाव डेपोची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत.  अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना…

पालकमंत्री दादा भुसे, नाशिक

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news