नाशिक : पेट्रोलपंपचालकास ‘इतक्या’ लाखांचा चुना

नाशिक : पेट्रोलपंपचालकास ‘इतक्या’ लाखांचा चुना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पेट्रोलपंपावर काम करणाऱ्याने अकाउंटंटसोबत संगनमत करून आणखी एकाच्या मदतीने ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शिंदेगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुजीब हबीब पठाण (५०, रा. शिंदेगाव) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित अल्तमेश राजमुहमंद सय्यद (रा. सिन्नर), शराफतअली अजगरअली शेख व करामतअली अजगरअली शेख (दोन्ही रा. शिंदेगाव) यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार संशयितांनी जानेवारी २०१८ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जनसेवा ट्रान्स्पोर्ट पेट्रोलपंपावर गंडा घातला. पेट्रोलपंपावर अकाउंटचे काम करणाऱ्या अल्मेश सय्यद याने हैदराबाद रोड करिअरचे मालक शराफतअली व त्याचा भाऊ करामत अली शेख यांच्याशी संगनमत करून डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर आलेल्या वाहनांच्या काही पावत्या जमा न करता डिझेलचे पैसे आपसात वाटून घेत मुजीब यांना ७२ लाख १५ हजार ९४६ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news