आरोपीला मोठ्या शिताफीने पकडणाऱ्या महिला कॉन्स्टेबल सरला खैरनार यांचे पोलीस आयुक्त तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
आरोपीला मोठ्या शिताफीने पकडणाऱ्या महिला कॉन्स्टेबल सरला खैरनार यांचे पोलीस आयुक्त तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Nashik : महिला कॉन्स्टेबलचे धैर्य, हातात चाकू असताना खून्याला पकडले

Published on

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरात खून, दरोडे, चैन स्नॅचिंग च्या घटना थांबत नसून आज गुरुवार सकाळी साडे नऊच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून चाकूने भोकसून खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.

याबाबत मिळाली माहिती अशी की, मयत पवन नथू पगारे (रा. कानिफनाथनगर, श्रीकृष्णनगर, सातपूर कॉलनी) आणि संशयित आरोपी अतुल अजय सिंग (रा. सोमेश्वर कॉलनी) हे दोघे युवक काल रात्रीपासून सिंग याच्या गाडीवर परिसरात फिरत होते. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कॅनॉल रोड, सोमेश्वर कॉलनी परिसरात मृत पगारे कडे सिंग आपली गाडी मागत होता पण पगारे गाडी देत नसल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून संतापलेल्या संशयित आरोपी अतुल अजय सिंग याने पवन पगारे याच्यावर चाकूहल्ला केला यात पवन पगारे याचा मृत्यू झाला. याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल सरला खैरनार यांनी हा खून करून पळत असलेल्या संशयित आरोपीस सिंग यास मोठे धेर्य दाखवत पकडले व नागरिकांची मदत घेत पोलिस ठाण्यास घटना कळवली. सरला खैरनार यांनी मोठ्या धैर्याने चाकू असलेला आरोपी पकडल्याने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी विशेष अभिनंदन केले तसेच या कामगिरीबद्दल त्यांना पारितोषिक देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

या घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन संशयितास ताब्यात घेतले व घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news