देवळा; पुढारी वृत्तसेवा : वासोळ (ता. देवळा) येथे मागील भांडणाचा राग धरून कांदा चाळीला शुक्रवारी (दि. २६) रात्री १२ च्या सुमारास आग लावल्याने एकच खळबळ उडाली. यात सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भूषण देविदास आहिरे (रा. वासोळ, ता. देवळा) यांच्या मालकीच्या शेत शिवारातील कांद्याच्या चाळीला शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास गोरख शंकर पवार (रा. वासोळ) यांने आग लावली. अशी फिर्याद भूषण आहिरे यांनी दिली आहे. यात अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आरोपी गोरख पवार याने मागील भांडणाचा राग मनात धरून भूषण आहिरे यांना दमदाटी केली होती. यात पवार याने फिर्यादीच्या शेतात असलेल्या कांदा चाळीला आग लावून दिली. या आगीत अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण, देवरे करीत आहेत.
हेही वाचलंत का?