नाशिक : चांदीच्या गणपतीचे अलंकार चोरणारा गजाआड

नाशिक : चांदीच्या गणपतीचे अलंकार चोरणारा गजाआड
Published on
Updated on

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_title" view="circles" /]

नाशिक : रविवार कारंजा येथील प्रसिद्ध चांदीचा गणपती मंदिराच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करीत मंदिरातील दागिने चोरणाऱ्या संशयिताला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. चोरट्याच्या हल्ल्यात मंदिराचा सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

निहाल यादव (२१, मूळ रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. त्याच्या हल्ल्यात नारायण हाके (रा. काजीपुरा, जुने नाशिक) हे जखमी झाले आहेत. सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १६) पहाटे 3 ते 3.30 च्या सुमारास संशयित निहाल हा मंदिराजवळ आला होता. तो मंदिरात जात असताना हाके यांनी त्याला मंदिरात जाऊ नको, असे सांगितले होते. त्यामुळे निहालने त्याच्याकडील लोखंडी रॉडने हाके यांच्या डोक्यात मारले. त्यात हाके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. संशयित निहालने मंदिराची काच फोडून आतमध्ये शिरला. गणपतीच्या अंगावर असलेले चांदीचे दागिने घेऊन तो पसार झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करीत संशयिताचा पाठलाग करीत त्याला गंगावऱ्हे परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून लुटीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सरकारवाडा पोलिसांत निहालविरोधात जबरी चोरी आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, संशयित निहालला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित यादव हा सुमारे दीड महिन्यापासून नाशिकमध्ये वास्तव्याला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news