Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक

Nashik | अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक
नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा
गोंदेगाव ता. निफाड येथील एका हॉटेलमध्ये अवैध गुटखा विक्री प्रकरणी लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाचे अधिसुचनेप्रमाणे राज्यात उत्पादन, वितरण व साठ्यास प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला, जाफरानी जर्दा, राजनिवास सुगंधी पानमसाला, व्ही वन विंग तंबाखू अशा गुटखा सदृश्य पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने १३,६३५ रुपयाचा अवैध गुटखा मिळून आला. मानवी शरीरास अपायकारक व हानिकारक असल्याचे माहीत असूनही आर्थिक फायद्यासाठी अवैध गुटखा साठा व विक्री करतांना आढळून आलेल्या आरोपी शरद दत्तु फापाळे (वय ४२) यास पोलीस नाईक नवनाथ नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून  लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी. जे. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वसंत हेंबाडे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news