सातपूर : पुढारी वृत्तसेवा- सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सीएट कंपनी समोर मनपाच्या सिटीलिंक बसने आपल्या दुचाकीवर कामावर चाललेल्या कामगारास जोरदार धडक दिली. या धडकेत कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी विश्वनाथ झोटे (वय ५३ रा. शिवाजी नगर) हे आपली दुचाकी क्र.एमएच १५ एए ८९७० ने शनिवार (दि. १३) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कामावर जात होते. तेव्हाच नाशिक मनपाची सिटीलिंक बस क्र. एमएच १५ जीएन ७६९८ भरधाव वेगाने जात असताना शिवाजी यांच्या दुचाकीला कट लागला यात शिवाजी यांच्या डोक्याला जबरी मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शिवाजी झोटे हे सातपूर मध्ये लिज्जत पापड कंपनी मध्ये कामास होते. त्याच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. सातपूर पोलीस स्टेशन मध्ये शिवाजी यांच्या नातेवाईक कंपनी मधील कामगार मोठी गर्दी केली होती. सिटी लिंकच्या वाहचालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. मनपाच्या माध्यमातून आर्थिक मदत म्हणून भरपाई द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. सातपूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी नातेवाईक यांना नियमानुसार कारवाई करून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
आंदोलनाचा इशारा
कार्बन नाका ते ज्योती स्टेक्चर कंपनी पर्यंतचा मुख्य रस्ता असून देखील अरुंद आहे. तसेच पावसाळी नाल्यावर अरुंद पूल आहेत. या रस्तावर मोठ्या प्रमाणात नेहमी अपघात होत असतात. याबाबत सामाजिक कार्यकर्ते बंजरंग शिंदे व माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांनी अनेकदा मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त ट्रॅफिक विभाग यांना सदर अपघात प्रवण रस्ता वर उपाययोजना करून, रस्ता रुंदीकरण व रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग करणाऱ्यावर कारवाई करावी याबाबत निवेदन दिले आहेत. परंतु कारवाई होत नसल्याने व रस्ता रुंदीकरण होत नसल्याने कामगारांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्थानिक मा. नगरसेवकाची देखील भूमिका उदासीन दिसून येत आहे. औद्यगिक वसाहतीमधील प्रश्नाविषयी कारवाई होत नसल्याने वंचित बहुजन आघाडी नाशिक शहर सचिव बजरंग शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा :