Nashik News : नामको’च्या विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा

Nashik News : नामको’च्या विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तर महाराष्ट्राची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दि नाशिक मर्चन्ट्स को-ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा बुधवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता आयोजित बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलाणी यांनी नूतन संचालकांना प्रमाणपत्राचे वितरण केले. तसेच बँक प्रशासनाकडूनदेखील संचालकांचा सत्कार केला.

प्रगती पॅनलचे १९ उमेदवार विरुद्ध सात अपक्षांमध्ये झालेल्या या निवडणुकीत प्रगती पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. वास्तविक संपूर्ण निवडणूक औपचारिकता असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते. निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, गेल्या २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीसाठीच्या निवडणुकीचे विविध टप्पे निश्चित करून २७ डिसेंबरपर्यंत सभेचे कामकाज तहकूब केले होते. निश्चित करून दिलेल्या टप्प्याप्रमाणे बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि.२७) सभेचे कामकाज पुढे करून निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलाणी यांनी विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा करून त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. बँकेची निवडणूक अत्यंत शांततेच्या वातावरण पार पडली असून, निवडणुकीचा अनुभव पुढील पदोन्नतीसाठी उपयोगी पडणार असल्याचे मुलाणी यांनी नमूद केले.

याप्रसंगी सहायक निवडणूक अधिकारी अरुण ढोमसे व राजीव इप्पर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित, सरव्यवस्थापक त्रिगुण कुलकर्णी, सहायक सरव्यवस्थापक अशोक पोळपाटील, बोर्ड विभागप्रमुख कल्पेश पारख आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

नव्या वर्षात नवा अध्यक्ष

निवडणुकीत प्रगती पॅनलने एकतर्फी बाजी मारत सातही अपक्षांचा दारुण पराभव केल्यानंतर नवनियुक्त संचालक मंडळाकडून बँकेच्या अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नव्या वर्षात म्हणजेच १ जानेवारी रोजी बँकेच्या मुख्यालयात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत नवा अध्यक्ष ठरविण्यात येणार आहे. अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

'प्रगती'चे २१ संचालक

नवनिर्वाचित संचालकांमध्ये वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, विजय साने, रंजन ठाकरे, अविनाश गोठी, महेंद्र बुरड, ॲड. आकाश छाजेड, भानुदास चौधरी, हरीश लोढा, सुभाष नहार, देवेंद्र पटेल, ललितकुमार मोदी, नरेंद्र पवार, प्रकाश दायमा, प्रफुल संचेती, अशोक सोनजे, गणेश गिते, प्रशांत दिवे, सपना बागमार, शीतल भट्टड यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news