नाशिक : नवविवाहीताचा ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच मृत्यू

देवळा : शेवाळे वस्तीनजीक पलटी झालेला ट्रॅक्टर. (छाया - सोमनाथ जगताप) 
देवळा : शेवाळे वस्तीनजीक पलटी झालेला ट्रॅक्टर. (छाया - सोमनाथ जगताप) 

नाशिक (देवळा/ खामखेडा) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील खामखेडा येथे शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा नवविवाहीत शेतकऱ्याचा शनिवारी (दि २२) रोजी रात्री ९ वाजता ट्रॅक्टर पलटी होऊन जागीच दुर्दैवी अंत झाला.

शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा ता. देवळा येथे घडली आहे. राकेश दिनेश धोंडगे असे मृत झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून, महिन्याभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मूळचे निमगोले येथील असलेले धोंडगे कुटुंब पिळकोस शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. शनिवारी (दि.२२) रोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी रात्री ९ वाजता दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असताना खामखेडा येथील शेवाळे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यात तो दबला गेला. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या राकेशला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी राकेशला मृत घोषित केले. अवघ्या महिन्याभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. पण या दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने संसार उध्वस्त झाला आहे. देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक सागर पाटील, पोलीस शिपाई सुरेश कोरडे आदी पुढील तपास करत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news