नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

चांदवड : मावळते तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारताना नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी. (छाया - सुनिल थोरे)
चांदवड : मावळते तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारताना नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी. (छाया - सुनिल थोरे)

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुका तहसीलदारपदाचे सूत्रे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी गुरुवार (दि.१५) रोजी मावळते तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडून स्वीकारले. पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार कुलकर्णी यांनी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचा परिचय करून घेतला. कुलकर्णी यांची बदली नंदुरबार जिल्हयातील नवापूर येथून चांदवडला नुकतीच झाली आहे.

राज्याच्या कारभाराची सत्ता बदलल्याने गेल्या वर्षभरापासून महसूल विभागातील बदल्या रखडल्या होत्या. यामुळे बदल्या कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चांदवडचे मावळते तहसीलदार प्रदीप पाटील यांनी चार वर्ष तालुक्यात कामकाज केले आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना काळात तहसीलदार प्रदीप पाटील यांनी कार्यालयात न बसता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडवल्या आहेत. अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसत त्यांना धीर दिला आहे. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत पाटील यांनी नागरिकांचे प्रबोधन करीत तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. गोरगरीब जनतेला कोरोना काळात रुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात तहसीलदार पाटील यांचा मोठे योगदान आहे. यामुळे बहुतेक नागरिकांचे जीव वाचले आहेत. तहसीलदार पाटील यांचा मनमोकळा स्वभाव, प्रसन्न चेहरा अन कायम मदतीचा हात यामुळे तालुक्यातील नागरिकांशी पाटील यांची एक प्रकारे नाळ जोडली गेली आहे. तहसीलदार पाटील यांच्या बदलीमुळे नागरिकांनी तुम्ही जाऊच नये अशी अट घातली आहे. मात्र प्रशसकीय बदली असल्याने आपल्याला जावेच लागेल तुमचा सहवास नेहमीच माझ्या सोबत असेल असे सांगताच तहसीलदार पाटील अन नागरिकांचे अश्रू दाटून आले होते.

चांदवडला काम करण्याची गेल्या अनेक वर्षापासून इच्छा होती. आज ती मला मिळाली आहे. मी पण एक ग्रामीण भागातील असल्याने खेड्यात, गावात काय अडचणी असतात त्यांची मला जाणीव आहे. माझ्याकडे येणारा प्रत्येक गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक यांचे जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत मी काम करीत राहील. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचवण्याचे मी नक्कीच प्रयत्न करेल. – मंदार कुलकर्णी, तहसीलदार चांदवड.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news