नाशिक : अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार, ‘शाळेत बदनामी करु’ अशीही दिली धमकी

नाशिक : अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार, ‘शाळेत बदनामी करु’ अशीही दिली धमकी
Published on
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : पुृढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी 'कोणाला काही सांगितले तर तुझ्या भावाला मारून टाकीन तसेच शाळेत तुझी बदनामी करू', अशी धमकी दिल्याप्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेरवाडी येथे बलात्कार प्रकरणी अटकेत असलेले आरोपी समाधान बाजीराव संगमनेरे व संतोष ऊर्फ पिंटू केदू ऊर्फ केरू बेंडकुळे (दोघेही रा. खेरवाडी, हल्ली मुक्काम निर्मला विहार, निळवंडी रोड, दिंडोरी) यांनी अल्पवयीन मुलीला घरात बोलवून पूर्वतयारी करून दरवाजाची आतून कडी लावून मुलीवर सामूहिक बलात्कार करत याबाबत कोणालाही काही सांगितले तर तुझ्या भावाला मारून टाकू तसेच तुझ्या शाळेत बदनामी करण्याची धमकी दिल्याचे पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक सचिन पाटील, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनानुसार सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी तपास करत आहेत. आरोपींना निफाड न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news