नाशिक : एक तप लागले श्री काळाराम मंदिर उभारायला…

नाशिक : एक तप लागले श्री काळाराम मंदिर उभारायला…
Published on
Updated on


पश्चिम भारतातील प्रभू श्रीरामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक म्हणजे श्री काळाराम मंदिर होय. या ठिकाणी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील दोन फूट उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे श्रीरामनवमी उत्सवात एकादशीला भगवान श्रीराम, हनुमान आणि गरुड यांच्या रथाची पंचवटीतून निघणारी यात्राही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी त्याकाळी दोन हजार कारागीर १२ वर्षे राबत होते.

श्री काळाराम मंदिर हे काळ्या दगडात बांधलेले आहे. माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांच्या सांगण्यावरून हे मंदिर बांधण्यात आले. काळाराम मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले आहे. ओढेकर यांना एके दिवशी स्वप्नात गोदावरी नदीत श्रीरामाची काळ्या रंगाची मूर्ती असल्याचा भास झाला. त्यानंतर त्यांनी नदीतून त्या मूर्ती आणल्या आणि हे मंदिर बांधले. सन १७७८-१७९० मध्ये या काळात हे मंदिर बांधण्यात आले. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून, बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या असलेल्या मूर्तीही काळ्या दगडातीलच आहेत. म्हणूनच त्याला श्री काळाराम असे म्हणतात.

या मंदिराचे बांधकामासाठी दोन हजार कारागीर 12 वर्षे राबत होते. त्या काळात मंदिर बांधणीचा अंदाजे खर्च २३ लाख इतका आल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसर २४५ फूट लांब व १४५ फूट रुंद आहे. मंदिर परिसराला १७ फूट उंच दगडाची भिंत आहे. मंदिराच्या चारही दिशांना चार दरवाजे आहेत. या मंदिराच्या कलशाची उंची ६९ फूट इतकी आहे. पूर्व महाद्वारातून आत गेल्यावर भव्य सभामंडप असून त्याची उंची १२ फूट आहे आणि येथे चाळीस खांब आहेत. हनुमान मंदिर असून, ते आपल्या लाडक्या रामाच्या चरणांकडे बघताना दिसतात.

श्रीराम राहिलेल्या ठिकाणी मंदिर
धार्मिक कथांनुसार, प्रभू श्रीराम वनवासात पंचवटीत राहिले, तेव्हा ऋषी, मुनींनी त्यांच्याकडे राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. श्रीरामांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि कृष्णरूप धारण करून ऋषी, मुनींना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त केले, अशी पौराणिक कथा आहे. तसेच या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, सध्या जेथे श्रीराम मंदिर आहे, तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत. प्रभू श्रीरामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले, त्या ठिकाणी हे मंदिर असल्याची नाशिककरांची धारणा आहे.

श्रीराम नवमीनिमित्त वासंतिक नवरात्रोत्सव
श्री काळाराम संस्थानच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त वासंतिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. १७) पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ७ ला महापूजा, दुपारी 12 ला श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. सायंकाळी ७ वाजता अन्नकोट महोत्सव होईल. शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी ४.३० वाजता श्रीराम व गरुड रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २०) मंत्रजागर व गोपालकाल्याने महोत्सवाचा समारोप होईल.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news