नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

File Photo
File Photo

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वरचेगाव येथील तेलीखुंट, टेलिफोन कॉलनी परिसरातील एका घरात गुटखा विक्री करणाऱ्यावर छापा टाकत चांदवड पोलिसांनी गुटखा, सिगारेटसह तब्बल ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गुटखा विक्री करणारा व्यक्ती पळून गेला. त्याच्याविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वरचे गावात संजय सोनू सोमवंशी घरात गुटखा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गर्जे यांनी पोलिसांचा फौजफाटा घेत संशयित गुटखा विक्री करणाऱ्या सोमवंशीच्या घरावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच तो पळून गेला. पोलिसांनी त्यांच्या घरातून विविध ब्रॅण्डचे पानमसाला, सुगंधी तंबाखू, सिगारेटचे ६२९ पॅकेट्स जप्त केले.

जादा कमाईमुळे अनेकांना गुटखा विक्रीचा नाद
गुटखा विक्री बंद असल्याने गुटख्याला सोन्याचे भाव आले आहेत. १० रुपयांची पुडी तीन पट म्हणजे ३० रुपये, तर २५ रुपयांची पुडी ७० रुपयाला मिळत आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त पैसे मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक गुटखा विक्री करण्याचे प्रकार संपूर्ण जिल्ह्यात वाढले आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news