Nashik : पदाचा राजीनामा न दिल्याने महिला सरपंचास मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Nashik : पदाचा राजीनामा न दिल्याने महिला सरपंचास मारहाण, व्हिडीओ व्हायरल

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील नाशिक पुणे रस्त्या जवळील पळसे गावात सरपंच प्रिया गायधनी यांना एका महिला सदस्याने ग्रामपंचायत कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

प्रिया दिलीप गायधनी असे मारहाण झालेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. पळसे गावातील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी ( दि. १८) सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ताराबाई होनाजी गायधनी असे मारहाण करणाऱ्या महिला सदस्याचे नाव आहे. पळसे ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन पॅनलचे बारा सदस्य तसेच विरोधी श्री विकास पॅनलचे पाच सदस्य निवडून आले आहे. निवडणुकीनंतर दोन्हीही पॅनल एकत्र झाले. सरपंच व उपसरपंच पद हे रोटेशन पद्धतीने ठरवण्यात आले. सरपंच प्रिया गायधनी यांनी त्यांच्या पदाचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ताराबाई गायधनी यांनी केली होती. सरपंच गायधनी राजीनामा देत नसल्याने त्यांना मारहाण झाल्याचे पळसे गावात बोलले जात आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे पळसे गाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत येत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news