नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार

नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपूर अशोकनगर व नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी बाराशे मिमी व्यासाच्या सिमेंट पाईप लाईनला गळती लागल्याने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२७) सातपुर विभागातील जुना प्रभाग क्र. ८, १० व प्रभाग क्र. ११ भागश: मधील प्रबुद्धनगर परिसर, तसेच नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्र. ७ (भागश:) मध्ये संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. बुधवारी (दि.२८) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. पश्चिम विभागातील प्रभाग क्र. ७ (भागश:) मधील गंगापूर रोडवरील माणिकनगर, श्रमिक कॉलनी, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन परिसर, विनय कॉलनी, सहदेवनगर, सुयोजित गार्डन, दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन सोसायटी, चैतन्यनगर, आयाचित नगर, निर्मला कॉन्व्हेंट शाळा, सर्व परिसराला मंगळवारी (दि.२७) पाणी पुरवठा होणार नाही.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news