नाशिक : सिक्युरिटी नोटप्रेसमध्ये कोब्रा नागाची एंट्री…

नाशिकरोड : येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस परिसरातून सर्पमित्र इंगोले व त्याच्या सहकाऱ्यांनी पकडलेला कोब्रा नाग. (छाया: उमेश देशमुख)
नाशिकरोड : येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस परिसरातून सर्पमित्र इंगोले व त्याच्या सहकाऱ्यांनी पकडलेला कोब्रा नाग. (छाया: उमेश देशमुख)
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस मध्ये ऐन सुट्टीच्या दरम्यान कोबरा जातीचा विषारी नाग घुसल्याने प्रेस कामगारांमध्ये मोठी घबराट निर्माण होऊन खळबळ उडाली. दरम्यान, काही वेळाने तातडीने सर्पमित्राला बोलावून कोब्रा जातीचा विषारी नाग पकडण्यात आला. त्यानंतर कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसच्या ब्लॅक गेटजवळ नागाची एंट्री झाल्याची घटना घडली. कामगार जेवणाच्या सुट्टीत बाहेर पडत असताना अचानकपणे कोब्रा जातीचा विषारी नाग घुसला. त्यानंतर हा नाग सीआयएसएफच्या केबिनजवळ गेला. त्यानंतर कामगार व सीआयएसएफच्या जवानांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यानंतर तातडीने सर्पमित्र इंगोले यांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र इंगोले व त्याच्या सहकारी मित्राने कोब्रा जातीच्या नागाला बाटलीत जेरबंद केले. त्यानंतर मात्र कामगारांनी हुश्श म्हणत… दिलासा व्यक्त केला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news