नाशिक : येत्या शनिवारी खा. शरद पवार यांचा उपस्थितीत हिंद मजदूर सभेचा अमृत महोत्सव

शरद पवार
शरद पवार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

देशासाठी पासपोर्ट, मुद्रांक चेक्स, चलनी नोटा आदींची छपाई करणारी नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मंजदूर संघ ही हिंद मजदूर सभा राष्ट्रीय संघटनेशी सलंग्न आहे हिंद मजदूर सभेने यंदा ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त देशातील पहिला अमृतमहोत्सवी सोहळा शनिवारी (ता.८) सायंकाळी साडेचार वाजता प्रेसच्या नाशिकरोड जिमखाना येथे माजी केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ही माहिती आज पत्रकारांना दिली.

हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हरभजनसिंग सिध्दू, खजिनदार जयवंतराव भोसले, महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव साळवी, संजय वढावकर, खासदार हेमंत गोडसे यांची प्रमुख उपस्थिती राहील. प्रत्येक राज्यात अमृतमहोत्सवी कार्यक्रम होणार असून त्याची सुरुवात नाशिकहून होत आहे. समारोप नागपूर येथे होणार आहे. नाशिकरोडच्या कार्यक्रमाला कामगार नेते रामभाऊ जगताप, गांधीनगर प्रेसचे राम हरक, सीटूचे सीताराम ठोंबरे, श्रमिक कामगार सेनेचे सुनिल बागूल, जिल्हा कामगार कृती समितीचे डी. एल. कराड, आयटकचे राजू देसले, राज्य कर्मचारी संघटनेच्या सुनंदा जरांडे, इंटकचे आकाश छाजेड, एचएएल युनियनचे संजय कुटे, वीज संघटनेचे व्ही. डी. धनवटे, महिंद्राचे एन. डी. जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. प्रेस मजदूर संघाचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, अविनाश देवरुखकर, संदीप व्यवहारे आदी संयोजन करत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news