अधिवेशनात व्यस्त असल्याने आज ईडी कार्यालयात गेलो : पी. एन. पाटील | पुढारी

अधिवेशनात व्यस्त असल्याने आज ईडी कार्यालयात गेलो : पी. एन. पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभेचे अधिवेशन असल्यामुळे मला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे बुधवारी आपण ईडी कार्यालयात गेलो होतो, असे आ. पी. एन. पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचे छापासत्र सुरू आहे. मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही ईडीने छापा घतला. या छाप्यात संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज साखर कारखाना चालविण्यासाठी घेतलेल्या बि—क्स कंपनीला दिलेल्या कर्जासंबंधीची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली.

 ब्रिक्स कंपनीशी केडीसीसी बँकेकडून त्या काळात झालेल्या व्यवहारसंदर्भात यापूर्वी सर्जेराव पाटील पेरिडकर, विलास गाताडे व आसिफ फरास यांना चौकशीसाठी ईडीने बोलावले होते. दि. 24 मार्च रोजी ईडी कार्यालयाकडून मलाही नोटीस बजावली होती. त्यामध्ये मलाही ईडीची नोटीस आली आहे. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने मला उपस्थित राहता आले नाही. ईडी कार्यालयाच्या नोटीसचा मान राखत आज आपण ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिलो होतो, असे आ. पाटील यांनी सांगितले.

Back to top button