नाशिक : घारीला जीवनदान देऊन रक्तमित्र मणियार झाले पक्षीमित्र

पक्षाीमित्र नाशिक,www.pudhari.news
पक्षाीमित्र नाशिक,www.pudhari.news

जूने नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आकाशात रंगीबिरंगी पतंग उडत होत्या. तेव्हा जखमी अवस्थेत असलेली घार जूने नाशिक येथील ज्येष्ठ समाजसेवक नदीम मणियार यांची मुलगी इन्शा फातेमा व मुलगा मोहम्मद अर्श यांच्या निदर्शनास आली. त्याक्षणी मणियार कुटुंबीयांनी हळद आणि घरगुती पद्धतीने त्याचे प्रथमोपचार सुरू केले. मांज्यामुळे घारीच्या पंखात खोल जखम झाली होती. यामुळे घारीला त्वरित ते दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले. घारीला १४ टाके पडले होते. उपचारानंतर घारीला वन विभागाकडे सोपविण्यात आले. जखमी घारीला जीवनदान मिळाल्यानंतर इन्शा आणी अर्श यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.

अत्यंत गरजेच्या वेळी दवाखान्यात असलेल्या गोरगरीब रुग्णांना रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या जुन्या नाशकातील ज्येष्ठ समाजसेवक नदीम मणियार रक्तमित्र म्हणुन प्रसिध्द आहेत. पण यावेळी मणियार यांनी एका जखमी अवस्थेत सापडलेल्या घारीला जीवनदान देत आपण रक्तमित्र बरोबर पक्षीमित्र असल्याचे त्यांनी दाखवले आहे.

पक्षी हे निसर्गातील महत्त्वपूर्ण तत्व आहे. पक्षांची एखादी प्रजाती दुर्मिळ किंवा नष्ट होते तेव्हा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कित्येक अन्य प्रजातींवरही त्याचा वाईट परिणाम होतो. आज काल वाढती वृक्षतोड, मोबाईल टावर, प्रदूषण यामुळे पक्षांची संख्या कमी झाली आहे. म्हणून त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे.

नदीम मणियार, ज्येष्ठ समाजसेवक तथा रक्तमित्र

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news