सांगली : मोराळेमध्ये भर दुपारी घरातून दोन लाखाची चोरी | पुढारी

सांगली : मोराळेमध्ये भर दुपारी घरातून दोन लाखाची चोरी

तासगाव : पुढारी वृत्तसेवा ; मोराळे (ता. तासगाव) येथे भर दुपारी घरातून दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. लक्ष्मी भगवान वाघमारे (रा. मोराळे) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीमध्ये वाघमारे यांनी नातेवाईकांवर संशय व्यक्त केला आहे.

याबाबत माहिती अशी, लक्ष्मी वाघमारे या मोराळे येथे राहतात. त्यांनी घरातील पेटीमध्ये सोन्याची साडेतीन तोळे वजनाची मोहन माळ, अडीच व दोन तोळ्याची सोन्याची दोन चेन, १५ ग्रॅमच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, दोन ग्रॅमची कर्णफुले, दोन ग्रॅमची सोन्याची अंगठी, व ६० हजार रुपये रोख रक्कम असे एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांची मुद्देमाल ठेवला होता. चोरट्यांनी सर्व मुद्देमाल लंपास केला. तपास तासगाव पोलिस करीत आहेत.

 

Back to top button