Nashik Bribe News : वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक २० हजार रुपयांची लाच घेताना गजाआड

Nashik Bribe News : वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक २० हजार रुपयांची लाच घेताना गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवावनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या तक्रारदारावर कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या सातपूर वनविभागाचा वनपरिमंडळ अधिकारी व वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. शैलेंद्र आनंद झुटे (४८) असे वनपरिमंडळ अधिकाऱ्याचे नाव असून, साहेबराव बाजीराव महाजन (५४) हा वनरक्षक आहे.

तक्रारदार यांचे हॉटेल हयात दरबार हे वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अवैधरीत्या बांधकाम करीत व्यवसाय करत असल्याचा आरोप दोघा संशयित लाचखोरांनी केला. गत दहा वर्षांपासून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याने व पुढील दहा वर्षे कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दोघांनी तक्रारदाराकडे एक लाखाची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तक्रारीची शहानिशा करीत सापळा केला. तडजोड करीत संशयितांनी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार मंगळवारी (दि.२१) वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह पोलिस नाईक विनोद चौधरी, गणेश निंबाळकर, पोलिस अंमलदार शीतल सूर्यवंशी, चालक हवालदार परशुराम जाधव यांच्या पथकाने सापळा रचत दोघांना २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. दोघांविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news