नाशिक : वावी येथे ग्रामीण रुग्णालय, ट्रामा केअर सेंटरला मंजूरी

सत्यजित तांबे,www.pudhari.news
सत्यजित तांबे,www.pudhari.news
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
महामार्गावरील अपघाता मधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रामा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात केली होती. तसेच याबाबत सततचा पाठपुरावा आ. तांबे करत होते. आता या मागणीला यश आले असून तालुक्यातील वावी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. तसेच सरकारने शासन निर्णय जारी केला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येणार असल्याने आता अहमदनगर व नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे. ३० खाटांच्या या नियोजित ग्रामीण रुणालयासाठी शासन स्तरावरून स्वतंत्र पदनिर्मितीदेखील केली जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने अपर सचिव कविता पिसे यांच्या सहीने आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणून वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मंजुरी दिली. वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण आवारात ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात येईल. त्यासाठी जागा अधिग्रहण, नवीन इमारत बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वावी येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला हिरवा कंदील दिला असून, नाशिक-शिर्डी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळेल, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.

अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यामधील अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ट्रामा केअर सेंटर्सची निकडीची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी पायी बारी करणाऱ्या चार वारकऱ्यांना एका गाडीने चिरडल्याची घटना घडली होती. हे वारकरी जखमी अवस्थेत असताना त्यांना तातडीने उपाययोजना न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. परंतु, आता निष्याप पादचाऱ्यांचा आणि प्रवाशाचा नाहक बळी जाणार नाही. – सत्यजित तांबे, आमदार.

चाळीस गावांमधील लोकांना मिळणार आरोग्यविषयक सुविधा 
सिन्नर तालुक्यातील वावी हे गाव सित्रर शिडीं महामार्गावर वसलेले आहे, समृद्धी महामार्ग, नियोजित सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वे, ओझर एअरपोर्ट ते शिर्डी एअरपोर्ट मार्गावर अपघात झाल्यास, तसेच परिसरातील सुमारे ४० गावांमधील सर्वसामान्य लोकांना आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्रामा न युनिट सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांची होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news