यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला शुक्रवारी रात्री २ च्या सुमारास सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बस जळाल्याने किमान २५ प्रवासी आगीत होरपळून मृत्युमुखी पडले. दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिकनजीक अपघात होऊन १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताने झाली. वर्षभराच्या आत लागोपाठ झालेल्या या अपघातांच्या घटनांनी मन सुन्न झाले आहे.
येथील विदर्भ ट्रॅव्हल्सचे कार्यालय सकाळी बंद होते. त्यामुळे येथे माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. ट्रॅव्हल्स संचालक दरणे हे सकाळीच घटनास्थळी रवाना झाले. विदर्भ ट्रॅव्हल्स यवतमाळ येथील दरणे बंधू यांच्या मालकीची आहे. नागपूर, यवतमाळ येथून पुणे, मुंबई येथे प्रवासी सेवा देतात. विदर्भ ट्रॅव्हल्स (एमएच २९, बीई १८१९) बसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांची माहिती प्राप्त झाली. त्यामध्ये शेख दानिश शेख इस्माईल (चालक) संदीप मारोती राठोड (क्लिनर) शशिकांत रामकृष्ण गजभिये हे तिघे जखमी असून ते यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे.
हेही वाचा