नाशिक : वाळू वाहतूक करणारा ट्रक घाटाच्या पायथ्याशी पलटी

देवळा तालुक्यातील कांचन बारी घाटात पलटी झालेला ट्रक (छाया - सोमनाथ जगताप)
देवळा तालुक्यातील कांचन बारी घाटात पलटी झालेला ट्रक (छाया - सोमनाथ जगताप)

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील कांचनबारी घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने घाटाच्या पायथ्याशी पलटी झाली. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैव बलवत्तर म्हणून अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की आज रविवारी (दि.५) रोजी दुपारी १ च्या सुमारास देवळयाच्या दिशेने वाळू घेण्यासाठी येत असलेला ट्रक (क्रमांक एम एच १६/सी ए ७९२९ ) हा तालुक्यातील कांचनबारी घाटाच्या पायथ्याशी ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला. घाटात वाहतुकीची वर्दळ तुरळक असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र  ट्रकचालक कानिफनाथ नारळकर (२२) ,क्लिनर गणेश बिष्णू झिपरे(२२, दोघे राहणार शेगाव बडे (अहमदनगर) हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवळा पोलिसात या अपघाताची खबर देण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news