पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली, त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात चर्चेला उधाण आलेले असताना संजय राऊत यांचं विमानतळावर शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केलेली आहे.
नारायण राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडरवरून म्हटलंय की, "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र काळा पैसा मिळवाचा आणि कारवाई झाली की बोंबलायचं. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की, मुख्यमंत्री पदावर?", असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.
चंड शक्तीप्रदर्शनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि किरीट सोमय्यांवर कडाडून प्रहार केला. आमच्यावर कारवाया करून भाजपने कबर खोदली आहे, आम्हाला ठार मारलं, तरी आम्ही तुमचं राज्य येऊ देणार नाही, असा एल्गारच त्यांनी केला.
विक्रांत घोटाळ्यावरून त्यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर प्रहार केला. सोमय्यांच्या घोटाळ्यावरून राज्यसभा स्थगित करण्याची वेळ आली. भाजपचे खासदारसुद्धा घोटाळ्यावर बोलू शकले नाहीत. विक्रांतच्या पैशांतून सोमय्यांनी मनी लाँड्रिंग केले. विक्रांत घोटाळ्याबाबत राज्यात नव्हे, तर देशात गुन्हे दाखल होतील असा दावाही त्यांनी केला. आमच्यावर आलेलं संकट आम्ही संधी समजतो असे राऊत यावेळी म्हणाले. विमानतळावरून जंगी स्वागत झाल्यानंतर संजय राऊत घराच्या दिशेने रवाना झाले. घरी पोहोचल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत.
हे वाचलंत का?