मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज्यात तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मागणीसाठी ही भेट झाली असल्याचे समजते.
दरम्यान, पटोलेंनी शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. तपास यंत्रणांच्या कारवायांबाबत आणि राज्यातील लोडशेडिंगबाबत चर्चा केल्याचे पटोले यांनी सांगितले. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सोनिया गांधी निर्णय घेतील. २ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.
पटोले पुढे म्हणाले-आमची कोणतीही मागणी नाही, हायकमांड त्याबाबत निर्णय घेतील. शरद पवार, मुख्यमंत्री यांच्याशी २ दिवसांनंतर चर्चा करून निर्णय घेऊ.
आयएनएस विक्रांतचे पैसे गेले कुठे, याबाबत भाजपने उत्तर द्यावं. विषयाला बगल देणं भाजपची जुनी सवय आहे. भाजप उत्तर का देत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.