पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी सेल्फी घेण्यासाठी गेलेल्या फॅनला डोक्यात मारल्यानंतर त्यांना चांगलेच ट्रोल केले गेले. गर्विष्ठ, घमंडी म्हणत नेटकऱ्यांनी नाना पाटेकर यांच्यावर टीका केली. (Nana Patekar) या प्रकाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता या प्रकारानंतर नाना पाटेकर यांनी ट्विट करून माफी मागितली आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करून या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे. (Nana Patekar Apology)
नाना पाटेकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, 'एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी एका मुलाला मारताना दिसत आहे. खरंतर, हा सीक्वेंस आमच्या चित्रपटाचा आहे. आम्हाला रिहर्सल करायचं होतं. मागून कुणीतरी येतं आणि म्हणतं, ये म्हाताऱ्या टोपी विकायची आहे. मी टोपी घातली होती. मी त्याला मारतो. आणि त्याला म्हणतो, उद्धट होऊ नका. नीट वाग. ही पद्धत नाही बोलायची आणि तो पळून जातो. दिग्दर्शकाने आम्हाला अजून एक तालीम करायला सांगितली आणि म्हणाले, नाना जी सुरू करा. त्याचवेळी तो मुलगा येतो आणि आम्हाला वाटले की, तो टीमचीमध्ये आहे, सीननुसार आम्ही त्याला मारले.
नंतर समजले की, तो आमच्या टीममचा हिस्सा नाही. मग आम्ही त्याला बोलावलं, तो पळून गेला होता. तो व्हिडियो कदाचित त्याच्या मित्राने शूट केला असावा. आम्ही कुणाला कधी फोटोसाठी नकार दिलेला नाही.'