Sunny Leon : सनी लिओनी दिसणार नव्या पार्टी डान्समध्ये

सनी लिओनी
सनी लिओनी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओनी एका हटके अल्टीमेट पार्टी अँथम मध्ये दिसणार आहे. "थर्ड पार्टी" असे गाण्याचे नाव आहे. सनी लिओनी नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते आणि ती पुन्हा एकदा आणखी एका चार्टबस्टरसह मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. "केनेडी"च्या अभूतपूर्व यशानंतर आता ती एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. (Sunny Leon) केनेडी स्टारने सोशल मीडियावर तिच्या या चित्रपटाची उत्कंठा वाढवली आहे. सनी लवकरच तिच्या नवीन पार्टी साँगमध्ये दिसणार असून 'थर्ड पार्टी' अस या गाण्याचं नाव आहे. (Sunny Leon)

संबंधित बातम्या –

१५ नोव्हेंबरला आम्ही आवाज वाढवत आहोत आणि #ThirdParty सोबत डान्स फ्लोअर गाठत आहोत! ? रात्रीच्या लयीत जाण्यासाठी सज्ज व्हा. ???" अशी कॅप्शन तिने इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलीय.

सनीचे आगामी प्रोजेक्ट तितकेच कमालीचे असून संगीत जगतात तिने एक अजून नवीन पाऊल ठेवलं आहे. अभिषेक सिंगचे प्रतिभावान गायन आणि अपवादात्मक आदिल शेख यांचे डायनॅमिक कोरिओग्राफी असलेले "थर्ड पार्टी"हे गाणं असणार आहे.

अनुराग कश्यपच्या निओ-नॉयर थ्रिलर "केनेडी" मधील चार्लीच्या भूमिकेसाठी जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत आहे. सनी लिओनी प्रेक्षकांना मोहित करत आहे. तिच्या वाढत्या प्रशंसा दरम्यान ती 'कोटेशन गँग' मध्ये तिच्या तमिळ पदार्पणाची सगळेच वाट बघतात. जिथे ती जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by T-Series (@tseries.official)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news