नागपूर : आम्हाला तूर्त आंदोलनाची गरज नाही : डॉ बबनराव तायवाडे

डॉ बबनराव तायवाडे
डॉ बबनराव तायवाडे

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले गेले. यात अतिरिक्त 10 टक्के आरक्षण एकमताने मंजूर केले गेले. दुपारी विधानपरिषदेत चर्चा होईल. आज ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणून आम्हाला आंदोलन करायची गरज सध्या नाही असे प्रतिपादन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना आरक्षण नाकारले. आता यात मर्यादा वाढवण्याची शिफारस आहे. 50 टक्केवर वाढवण्यासाठी शिफारस केली. जरांगे पाटील यांची सगेसोयरे संदर्भात राजपत्र काढलं ते लागू करण्याची मागणी आहे. यात सरकार सगेसोयऱ्यांसाठी प्रयत्नात आहे. मात्र, जरांगे दोन बाजूने बोलत आहेत. सगेसोयरेवर वेळ द्यावा लागणार आहे.

अजून अहवाल आला नाही. अभ्यासानंतर त्यावर बोलेल. मात्र, सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध कायम आहे. मराठा जातीची लोकसंख्या सहा विभागात कमी आहे. यात 28 टक्के कसा असेल असा अभ्यास करू असेही बबनराव तायवाडे म्हणाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news