नागपूर : आजच्या मतदानातून देशात एक क्रांती घडेल : आमदार बच्चू कडू

आमदार बच्चू कडू
आमदार बच्चू कडू

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा आजच्या लोकसभा निवडणुकीत मतदानातून देशात एक क्रांती घडेल असा दावा प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. गेल्या वीस वर्षांपासून आम्ही शेतकरी शेतमजुरांसाठी लढत आहोत. मला मतदारांकडून एकच अपेक्षा आहे की, ही लढाई आम्ही शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कष्टकरी यांच्यासाठी लढत आहोत. तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी.

निश्चितच ही निवडणूक शेतकरी, शेतमजूर हे आम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आजच्या मतदानामुळे या देशात एक क्रांती घडेल. जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुरांच्या नावावर ही निवडणूक आगळीवेगळी ठरेल असेही बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news