Mysore Pak : ‘म्हैसूर पाक’चा जगातील ‘टॉप 50 स्ट्रीट फूड मिठाई’च्या यादीत समावेश

mysore pak
mysore pak

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mysore Pak : जगातील टॉप 50 स्ट्रीट फूड मिठाईमध्ये म्हैसूर पाकचे नाव अव्वल स्थानावर आहे. टेस्ट अॅटलस (Taste Atlas) द्वारे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत म्हैसूर पाकला 14 वे सर्वोत्तम स्ट्रीट फूड म्हणून स्थान देण्यात आले आहे. टेस्ट अॅटलस हे अन्न आधारित मासिक आहे हे जगभरातील स्ट्रीट फूडवर तपशीलवार पुनरावलोकने आणि माहिती प्रसिद्ध करते.

या मासिकाने नुकतीच जगातील सर्वोत्तम स्ट्रीट फूड मिठाईची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत म्हैसूर पाकसह कुल्फी, फालुदा यांच्यासह अन्य काही भारतीय मिठाई देखील आहेत. म्हैसूर पाक हे दक्षिण भारतीयांची आवडती मिठाई आहे. संपूर्ण दक्षिण भारतात म्हैसूर पाक (Mysore Pak) कोणत्याही सण-समारंभासाठी आवर्जून बनवतातच. असे म्हटले जाते म्हैसूर पाकचा जन्म म्हैसूर पॅलेसच्या स्वयंपाक घरात झाला. मात्र, हे फक्त कन्नडिंगापर्यंतच मर्यादित न राहता संपूर्ण दक्षिण भारतीयांचे आवडती मिठाई आहे.

Mysore Pak : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केला आनंद व्यक्त

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हैसूर पाकचा जगातील सर्वोत्तम स्ट्रीट फूड मिठाईंमध्ये समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले की, "कन्नडीगांना अभिमान आहे की, म्हैसूर पाकला टेस्ट अॅटलसने प्रकाशित केलेल्या जगातील टॉप 50 स्ट्रीट मिठाईंमध्ये 14 वा क्रमांक मिळाला आहे. म्हैसूर पाक शेअर करण्याच्या माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत जेव्हा माझे वडील आणि घरी आलेले नातेवाईक मला अजूनही घेऊन येतात."

म्हैसूर पाक हे कर्नाटकातील म्हैसूरचे मूळ आहे असे जरी या नावावरून सूचित होते, तरी काही जणांच्या मते ते प्रथम तामिळनाडूमध्ये जन्मले होते. मात्र, नंतर म्हैसूर येथे त्याची तस्करी करण्यात आली होती. तथापि, डीके शिवकुमार यांनी दावा केला की म्हैसूर पाक कर्नाटकातील आहे आणि लिहिले, "म्हैसूर पॅलेसमध्ये जन्मलेल्या आणि आज प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेल्या म्हैसूर पाकच्या (Mysore Pak) मागे लाखो शेफचे कठोर परिश्रम आणि कौशल्य आहे. याचे श्रेय या सर्वांनाच मिळायला हवे."

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news