National Mango Day : पावसाळ्यात जेवणाची चव वाढविसाठी बनवा चटपटीत आंब्याचे लोणचे | पुढारी

National Mango Day : पावसाळ्यात जेवणाची चव वाढविसाठी बनवा चटपटीत आंब्याचे लोणचे

पुढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळ्याचे दिवस संपून नुकतेच पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. मग पावसाळ्यात चहासोबत गरमा- गरम भजी, वडा खाण्याचा मोह सर्वांनाच होतो. दरम्यान २२ जुलैला ‘जागतिक मॅगो दिवस’ म्हणजे ‘जागतिक आंबा दिवस’ ( National Mango Day ) साजरा केला जातो. यानिमित्ताने आणि खास करून पावसाळ्यात जेवणाची चव वाढविणारे चटपटीत आंब्याचे लोणचे कसे बनवावे हे पाहूयात.

साहित्य :

कच्चे आंबे – २-३ नग

मोहरी – १ चमचा

तेल – ३ चमचे

मीठ – चवीपुरते

हिंग- अर्धा चमचा

हळद पावडर – १ चमचा

बडीशेप – चवीपुरते

मेथी दाणे – १ चमचा

लाल तिखट- १ चमचा

लसून- ४-५ पाकळ्या

काळिमिरी- अर्धा चमचा

लंवग- अर्धा चमचा

मोहरीची डाळ- २ चमचे

MANGO DAY - July 22, 2023 - National Today

कृती :

पहिल्यांदा दोन ते तीन कच्च्या आंब्याच्या कैरी घेवून त्या स्वच्छ पाण्याने धुवावे. यानंतर सर्व कैरी सुती कपडाने पुसून ध्यावे. कैरीवरील सर्व पाणी पुसल्यानंतर आणि कैरी कोरडी दिसल्यानंतरच ती कट करण्यास ध्यावी. कट करताना कैरीच्या आतील भागात असणारी कोय काढून तुम्हला हव्या तशा छोट्या- छोट्या फोडी करून घ्याव्यात. चिरलेल्या कैरीत एक चमचा हळद आणि मीठ घालून एकत्रित मिक्स करावे आणि त्यावर झाकण ठेवून रात्रभर मूरण्यास बाजूला ठेवून द्यावे.

Buy आंब्याचे लोणचे घरगुती पद्धतीने तयार केलेले व खात्रीशीर व चविष्ट पद्धतीने असलेले लोणचे online from S M FRUITS & VEGETABLES TRADERS.

दुसऱ्या दिवशी सकाळी कैरीच्या फोडी काढून उन्हात किवा पंख्याखाली ५ ते ६ तास सुकवून घ्याव्यात. दरम्यान एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा काळीमिरी, अर्धा चमचा लंवग, १ चमाचा मेथी दाणे, हिंग, चवीनुसार मीठ, २ चमचे मोहरीची डाळ, लाल तिखट बारीक करून घ्यावे. यानंतर कैरीच्या फोडी एका पसरट भांड्यात घेवून त्यावर मिक्सरमधील मसाले घालून चांगले मिक्स करावे. यानंतर एका कढाईत तेल गरम करून ते थोडं थंड झाल्यावर त्यावर ओतावे. पुन्हा एकदा पळीच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकत्रित करावे. शेवटी स्वच्छ धुवून घेतलेल्या बरणीत तयार केलेले आब्यांचे लोणचे मुरण्यासाठी ठेवावे.

मुरल्यानंतर कैरीचे लोणचे दररोजच्या जेवणात सेवन करावे. हे लोणचे जेवणाची चव वाढविण्यासोबत वर्षभरदेखील टिकते. ( National Mango Day )

यंदा चटकदार लोणच्याला महागाईची झळ; गृहिणींची लोणचे तयार करण्यासाठी लगबग | Sakal

हेही वाचा : 

Back to top button