माझे पहिले मतदान : नवमतदार नोंदणी अभियानामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद

file photo
file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने मोठ्या स्तरावर राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे विभागात १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाली आहे. विभागात या वयोगटातील एकूण दोन लाख आठ हजार ८४ मतदार आहेत. तर जळगाव जिल्ह्यात ४९ हजार ५८५, धुळे २३ हजार ५३३, नंदुरबारमध्ये २० हजार ७४० तर नगरमध्ये ४६ हजार ५३९ नव मतदारांचा समावेश आहे. तर दिनांक १७ ते २२ मार्च या कालावधीत राज्यात १ लाख ८४ हजार ८४१ इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी यंत्रणाचे प्रयत्न सुरु आहेत. त्या अनुषंगाने पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येत आहेत. नवमतदार आणि युवा वर्गावर मुख्यत्वे करुन लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्यासाठी महाविद्यालयांमध्ये मतदार साक्षरता क्लबमार्फत विशेष शिबिरांचे आयोजन देखील करण्यात आले. परिणामी नवमतदारांच्या नोंदणीत नाशिक आघाडीवर राहण्यात झाली. नाशिक जिल्ह्यात एकूण ४७ लाख ९८ हजार ३७० मतदार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदारांची टक्केवारी १.४१ इतकी आहे. नंदुरबार जिल्ह्यात हेच प्रमाण १.६४ टक्के, जळगाव १.४० टक्के, धुळे १.३४ आणि नगर जिल्ह्यात १.२८ टक्के आहे. नवमतदारांच्या नोंदणीत जळगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नंदुरबारमध्ये तुलनेत नवमतदारांची कमी नोंदणी झाल्याचे समोर आले आहे.

विभागामध्ये २० ते २९ या वयोगटातील मतदारांची एकूण संख्या २९ लाख ३६ हजार ५१ इतकी आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात नऊ लाख १४ हजार ९८२ मतदार आहेत. नंदुरबारमध्ये २९७७३६, जळगाव ६८७५०४, धुळे ३४३२६९, नगर ६९२५६० मतदारांचा समावेश आहे. या वयोगटातील सर्वाधिक मतदार नाशिक जिल्ह्यात आहेत. टक्केवारीचा विचार करता नाशिक जिल्ह्यात एकूण मतदारांमध्ये युवा मतदार १९ टक्के, नंदुरबार जिल्ह्यामध्ये २३.६ टक्के, जळगाव १९.५ तर धुळे जिल्ह्यात १९.५ अशी टक्केवारी आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news