आचारसंहिता भंगाच्या दीड हजार तक्रारी | पुढारी

आचारसंहिता भंगाच्या दीड हजार तक्रारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून राज्यात आचारसंहिता भंगाच्या 1 हजार 970 तक्रारी आल्या आहेत. यापैकी 1 हजार 374 ठिकाणच्या नोंदीमध्ये तथ्य आढळून आले आहे.

मतदारांना विविध प्रलोभने दाखविण्यात आले असून 58 ठिकाणी पैसे, 27 भेटवस्तू व कुपन, 33 मद्यवाटप आणि 68 ठिकाणी बंदूक दाखवून धमकावण्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 97 टक्के तक्रारींचे निसरण करण्यात आले आहे, असा दावा आयोगाने केला आहे.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या नोंदणीसाठी आयोगाने सी-व्हिजिल हे मोबाइल अँप कार्यान्वित केले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यापासून आचारसंहिता उल्लंघन झाल्याच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. पुण्यात 354, अमरावती 193, ठाण्यात 124 आणि मुंबई शहरात 105 तक्रारी आल्या आहेत.

गुगल प्ले स्टोअर किंवा आयओएस या ऍपवरून सी – व्हिजिल डाऊनलोड करावा. डाऊनलोडवर स्वतःची माहिती भरावी. तक्रार संबंधित माहिती फोटो, व्हिडीओ सहित त्यावर अपलोड करावी. संबंधित माहिती अपलोड झाल्यानंतर तक्रार नंबर मिळेल. निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंद झाल्यानंतर ती फिल्डवरील अधिकार्‍यांना वर्ग केली जाते. अवघ्या 15 मिनिटांत त्याची शहनिशा करून तथ्य आढळल्यास कार्यवाही करण्यात येते. कारवाई झाल्यानंतर तक्रारदारांना माहिती देण्यात येते.

बेकायदेशीर होर्डिंग्ज व बॅनर – 979 तक्रारी, 807 तक्रारीत तथ्य.
दारू वाटप 33 तक्रारी, 4 तक्रारीत तथ्य
भेटवस्तू वाटप 23 तक्रारी, चार तक्रारीत तथ्य
पैसे वाटप 58 तक्रारी 17 तक्रारीत तथ्य
वेळ संपल्यावर प्रचार 150 तक्रारी 102 तक्रारीत तथ्य
फायरिंग 68 तक्रारी, 48 तक्रारीत तथ्य
अन्य 591 तक्रारी, 365 तक्रारीत तथ्य.

Back to top button